सिमेंट कॉन्क्रेट
सिमेंटची बांधकाम व्यवसायात खरी गरज काय आहे असा प्रश्न पडला असेल तर वाळू,
खडी, वीट, जेली, स्टील यांना एकत्रित ठेवण्याचे काम ते करते. तसेच सिमेंट ही ताकद
आणि आयुष्यमान वाढवण्याचे कार्य करते. सिमेंट हे ३३, ४३ आणि ५३ ग्रेडमध्ये असतात
तर हे विविध ग्रेड सिमेंटची आणि वाळू यांची २८ दिवसात किती ताकद येते हे दर्शविते.
कॉन्क्रेट हे सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी यांचे मिश्रण असते. कॉन्क्रेट तयार करीत असताना त्यामधील घटक हे
ठराविक प्रमाणात घ्यावे लागतात अन्यथा त्यांची ताकद कमी होते. कॉन्क्रेटमध्ये पाणी
टाकल्यावर हायड्रेशन चालू होते. त्यामुळे ४० ते ५० मिनिटामध्ये त्याचा वापर करावा
लागतो. जेव्हा स्लॅप टाकला जातो तेव्हा कॉन्क्रेट स्टीलभोवती ओतत असताना त्यामध्ये
छिद्र, वेज राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्या कॉन्क्रेटमध्ये चिरा
पडतात आणि त्यांची ताकद कमी होते. त्यासाठी यांत्रिक व्हाब्रेटर वापरले असता त्यात
छिद्र आणि वेज राहत नाही आणि त्यांची ताकद वाढते. कॉन्क्रेट हे सकाळी किंवा संध्याकाळी
वापरणे अधिक उपयुक्त असते. जर ते दुपारी वापरले तर पाणी उडून गेल्याने त्यामधील
घटकाचे प्रमाण बदलते आणि हायड्रेशन व्यवस्थित होत नाही. परिणामी कॉन्क्रेटची क्षमता
कमी होते. जर दुपारी कॉन्क्रेट वापरण्याशिवाय पर्याय नसेल तर प्लास्टिक पेपर
त्यावर अंथरल्याने पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि हायड्रेशन व्यवस्थित
होते. कॉन्क्रेट क्युअरिग होणे महत्वाचे असते. क्युअरिग म्हणजे असे वातावरणकी कॉन्क्रेटमध्ये
सुयोग्य प्रमाणात द्रता असणे होय. ही आद्रता बाहेरून पाणी मारून टिकवली जाते. भिंतीला
बाहेरून पाणी मारले जाते तर छत किंवा स्लॅप यांसाठी १ मी × १ मी पाण्याचे डबके केले जाते. बीम आणि कॉलम
यांना मात्र ओलसर पोती वापरली जातात. क्युअरिगचा कालावधी २१ दिवस असते.
कॉन्क्रेटला बऱ्याचदा चिरा का पडतात हा प्रश्न पडत असेल. खरे तर वाळूमध्ये बारीक चिकणमाती
असते. ही चिकणमाती पाणी शोषते त्यामुळे कॉन्क्रेटमध्ये पाण्याचे प्रमाण कमी पडते
आणि हायड्रेशन व्यवस्थित होत नाही. परिणामी कॉन्क्रेटला चिरा पडतात. हे सर्व
टाळायचे असेल तर वाळूमधील चिकणमाती पाण्याने व्यवस्थित धुतली पाहिजे. बांधकामात
ज्या विटा वापरल्या जातात त्या पूर्णता भाजलेल्या नसतील आणि त्याचे कडे तुटले
असतील तर ते कॉन्क्रेटमधील पाणी शोषतात. त्यामुळे विटा बांधकामपूर्वी २४ तास
पाण्यात भिजवावे आणि ओल्या स्थितीत ते वापरावे जेणेकरुन क्युअरिग उत्तम होते.
प्रा. शामकुमार देशमुख (सोलापूर )
No comments:
Post a Comment